esakal | School Start: तब्बल दीड वर्षानंतर वाजली शाळेची 'घंटा'
sakal

बोलून बातमी शोधा

school

तब्बल दीड वर्षानंतर वाजली शाळेची 'घंटा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांडवगण फराटा : कोरोना महामारीच्या कालावधीत गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळेची घंटा अखेर आज वाजली आणि विद्यार्थी ऑनलाईन वरून ऑफलाईन आले. येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सुरू करण्यात आल्याची माहिती प्राचार्य एस. टी. गद्रे यांनी दिली. आज पहिल्या दिवशी इयत्ता दहावी आणि बारावीच्या वर्गातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने प्रशालेत उपस्थित सुमारे १६१ विद्यार्थी व ५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी करण्यात आली.

हेही वाचा: शेतकऱ्यांनी दिलेले सोयाबीन मुख्यमंत्र्यांना देणार भेट : फडणवीस

शाळा चालू करण्यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कोरोना विषयक सूचना देण्यात आल्या. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाचे काम करण्यात आले. दोन दिवसांनंतर पाचवी ते नववी व अकरावीचे वर्गही सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती गद्रे यांनी दिली. शाळा भरण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख सुनील घुमरे, डॉ. मंजुषा सातपुते-इसवे, बाळासाहेब फराटे, उपसरपंच सुभाष पाटील फराटे, धनंजय फराटे, गणेश फराटे, अमोल जगताप, विजय फराटे, ज्ञानेश्वर फराटे, उपमुख्याध्यापक सुनील थोरात, पर्यवेक्षक प्रमोद बाऊसकर, गणपत बोत्रे, बाळशिराम डोके, दादासाहेब उदमले व ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top