esakal |  विद्यार्थ्यांनो, अभ्यासाची चिंता सोडा...फक्त वसुंधरा वाहिनी ऐका... 
sakal

बोलून बातमी शोधा

BARAMAT

शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा व त्यांना वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून अभ्यासाची संधी उपलब्ध व्हावी, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. 

 विद्यार्थ्यांनो, अभ्यासाची चिंता सोडा...फक्त वसुंधरा वाहिनी ऐका... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने येथील विद्या प्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनीच्या वतीने शाळा वसुंधरेची ही शालेय अभ्यासक्रम मालिका सुरू केली आहे. 

कोरोनामुळे 78 टक्के लघू, सूक्ष्म उद्योगांचे काम बंद 

या मालिकेअंतर्गत विद्या प्रतिष्ठान मराठी मिडीयम माध्यमिक विद्यालय, विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदिर,  पिंपळी,  विनोद्कुमार गुजर बालविकास मंदिर या शाळांचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे अभ्यासक्रम मालिका प्रसारीत करण्यात येत आहे.
शाळाच बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा व त्यांना या वाहिनीच्या माध्यमातून अभ्यासाची संधी उपलब्ध व्हावी, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. या वाहिनीवरून सादर होणा-या या कार्यक्रमामुळे मुलांना विषयाचे चांगले आकलन होण्यास मदत होईल.

जिल्ह्यात हरघर गोठे, घरघर गोठे...

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकारने अद्याप शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिलेली नाही.  त्यामुळे विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून वसुंधरा वाहिनीवरून ही शालेय अभ्यासक्रम मालिका सुरु करण्यात आली आहे.  या कार्यक्रमामध्ये दर दिवशी एका विषयावर आधारित संवादरूपाने अधापन केले जाणार आहे, असे वसुंधरा वाहिनीच्या केंद्रप्रमुख आशा मोरे यांनी सांगितले. शाळा दैनंदिन सुरु होईपर्यंत वसुंधरा वाहिनीवरुन हा उपक्रम सुरु ठेवण्यात येणार असल्याचे व्हीआयआयटीचे प्रमुख डॉ. सतीशचंद्र जोशी यांनी सांगितले. निवेदक ऋतुजा आगम व स्नेहल कदम या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण व संपादन करत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मालिकेअंतर्गत सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे.  परंतु, ज्या ठिकाणी इंटरनेट पोहोचू शकत नाही, तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून शाळा वसुंधरेची हा शालेय कार्यक्रम चालू केला आहे. 
 - सुनेत्रा पवार, विश्वस्त विद्या प्रतिष्ठान.