

Govt Cracks Down on Schools Forcing Students to Buy Supplies
sakal
पुणे : राज्यातील खासगी शाळांकडून विशिष्ट दुकानांतूनच गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केली जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. अशाप्रकारे सक्ती केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.