राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा देशात उभारणे गरजचे: नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

राजीव गांधी ई लर्निंग स्कूल सारख्या शाळा देशात उभारणे गरजचे: नाना पटोले

सहकारनगर : सामान्यांच्या गरीब मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी देशात राजीव गांधी यांनी संगणक प्रणाली उभारली. तसेच शिवदर्शन येथील राजीव गांधी इ लर्निंग स्कूल सारख्या शाळा महाराष्ट्रातच काय देशात उभारणे गरजेचे आहे यातून चांगले नागरिक घडतील व राजीव गांधींचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिसाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवदर्शन येथील राजीव गांधी इ लर्निंग स्कूलमध्ये व्यक्त केले.माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांची जयंती निमित्ताने व शिवदर्शन येथील राजीव गांधी इ लर्निंग स्कूलच्या दशकपूर्तीनिमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. (Pune News)

हेही वाचा: अनिल देशमुखांना EDकडून चौथे समन्स; वकिलांनी केलं सूचक विधान

यावेळी जेष्ठ विचारवंत उल्हास पवार,ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन जोशी, शरद रणपिसे,माजी आमदार बाळासाहेब शिवरकर,अमीर शेख,महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, काँग्रेस गटनेते नगरसेवक आबा बागुल,नगसेवक अविनाश बागवे, प्रकाश आरणे,नंदकुमार बानगुडे , अभिषेक बागुल, द.स. पोळेकर,  इम्तियाज तांबोळी , धनंजय कांबळे, महेश ढवळे ,तेजस बागुल,इ. उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केले.

हेही वाचा: तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

यावेळी प्रथम स्व. राजीव गांधी यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये शाळेतील नंदन खाटपे, प्राची जगदाळे,प्रणव जागडे, प्रियांका ढमढेरे,जयदत्त सांडभोर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आबा बागुल म्हणाले,भारतीय संगणक युगाचे निर्माते राजीव गांधी यांच्या दुरदृष्टीतून प्रेरणा घेऊन 10 वर्षांपूर्वी राजीव गांधी इ लर्निंग स्कूल सुरू केली त्याची दशकपूर्ती होताना अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहे. आयआयटी,इंजिनिर,डॉक्टर होत आहेत. तसेच नासा सारख्या जगप्रसिद्ध संस्थेत काम करत आहेत ही अभिमानाची बाब आहे.याकार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित बागुल यांनी केले आभार सागर आरोळे यांनी मानले.

Web Title: Schools Like Rajiv Gandhi E Learning Built Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..