विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा । SCHOOL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा

पुणे : ऑनलाइन शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण न होणे, विद्यार्थी इंटरनेटच्या आहारी जाण्याची भीती असणे, अनेकवेळा शिकविलेले नीट न समजल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणात शिक्षकांबरोबरच पालकांची जबाबदारी वाढली आहे, अशा प्रतिक्रिया पालक, शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: बारामतीत महावितरणच्या वायरमनला मारहाण

राज्य सरकारने येत्या ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी ‘सकाळ’ने ‘ऑनलाइन शिक्षणाचे उमटणारे पडसाद’ या विषयी बातमी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावेळी पालक, शिक्षकांकडून याबाबत मते ‘सकाळ’च्या व्हाटस्‌अप क्रमांकाद्वारे मागविण्यात आली होती. त्याला भरघोस प्रतिसाद वाचकांकडून मिळाला असून त्याद्वारे वाचकांनी आपली मते मांडली आहेत.

हेही वाचा: रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

सुमंत मेमाणे : ‘‘ऑनलाईन शाळा सुरू असताना पालकांची भूमिका महत्वाची आहे. मुलांच्या नकळत ऑनलाईन अभ्यासावर लक्ष ठेवणे, त्यांच्याबरोबर मित्रासारखा संवाद साधणे, शिक्षकांसमवेत वेळोवेळी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करणे, हे पालकांनी आवर्जुन करायला हवे.’’

दिप्ती नारखेडे : ‘‘मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा निश्चितच कंटाळा आला आहे. वक्तशीरपणा, शिस्त, अभ्यास करण्याचे गांभीर्य ऑनलाइन शिक्षणात हरवले आहे. अगदी लहान मुलांना ही शिक्षण पद्धतीन नकोच.’’

हेमंत मुळे : ‘‘ऑनलाईन शाळा ही अपघाताने सुरू झाली आहे. या प्रकारच्या वर्गात शैक्षणिक वातावरण तयार होत नाही.’’

सत्यवान कदम : ‘‘कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षण ही तडजोड आहे. शाळा सुरू होणे गरजेचे आहे. मुलांच्या शारीरिक हालचाली या काळात कमी झाल्या आहेत. मुले इंटरनेटच्या व्यसनात अडकण्याची भीती आहे.’’

अपर्णा ढोरे : ‘‘ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना कंटाळा येत असून केवळ ४० टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गात उपस्थित असतात. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइनचा पाया तयार करणे अवघड आहे.’’

निकिता ढेंबरे : ‘‘ऑनलाइन शिक्षण हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे. शाळेत राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणणे, एकत्रित खेळणे, यातून अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. ते ऑनलाइन शाळेत शक्य होत नसल्याचे वास्तव आहे.’’

डॉ. संजय डुबल : ‘‘ऑनलाइन शिक्षण हे चुकीच्या दिशेने चालले आहे. मुलांचा सर्वांगीण विकासास अडथळा ठरणारे हे शिक्षण आहे. ऑनलाइनवर एकीकडे वर्ग सुरू असतो, आणि विद्यार्थी प्रत्यक्षात दुसरेच काहीतरी करत असतात, हे चित्र सर्वत्र दिसते. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे.’’

loading image
go to top