आता पावसाळ्यातील साथींच्या आजारांचे मिळणार पूर्वानुमान; शास्त्रज्ञांनी केला दावा

malaria
malaria
Updated on

पुणे - भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या हिवताप (मलेरिया) आणि अतिसारा सारख्या साथींच्या आजारांनी अनेकांचे प्राण जातात. अशा आजारांची पूर्वसूचना मिळण्यासाठी हवामानशास्त्रावर आधारित प्रणाली विकसित करणे शक्‍य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक हवामानात होणारे बदल या आजारांच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचे नुकतेच पुण्यातील शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले
आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने स्थानिक हवामानातील बदलांमुळे (पाऊस आणि तापमान) मलेरिया आणि अतिसार सारख्या आजारांमध्ये होणारी वाढ याचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासाबाबतची माहिती नुकतीच "नेचर सायंटिफिक रिपोर्ट'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

त्यानुसार मॉन्सूनमध्ये वाढणाऱ्या आजारांचे पूर्वानुमान अंदाज काढणे शक्‍य आहे. प्रत्येक शहरांचे भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती वेगळी असते. जर त्या भागातील हवामान आणि आरोग्याचा डेटा एकत्र केला तर देशातील विविध शहरांसाठी दोन ते तीन आठवडे अगोदर हा पूर्वानुमान अंदाज वर्तविणे शक्‍य होईल. या अभ्यासात अतुल कुमार सहाय, राजू मंडल, सुश्‍मिता जोसेफ, शुभायू शाह, प्रदीप आवटी, सोमनाथ दत्ता आदींचा सहभाग होता.

असा झाला अभ्यास
- पुणे व नागपूर या दोन जिल्ह्यांचा अभ्यास
- यासाठी 2009 ते 2016 दरम्यानचे आरोग्य व हवामानविषयक डेटाचा वापर
- या डेटाला एकत्रित करून मलेरिया आणि अतिसार आजारांची उच्चांकी कोणत्या शहरात आहे याचा अभ्यास

निष्कर्ष
- पुण्याच्या तुलनेत नागपूर येथे मलेरियाचे प्रमाण जास्त
- मॉन्सूनच्या चारही महिन्यांत पुण्यातील अतिसाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले
- तर नागपूरमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिसार प्रकरणांचे प्रमाण वाढले
- स्थानिक वातावरणाचा प्रभाव थेट आजारांचा घटनांच्या संख्येवर
- हवामान-आरोग्य डेटाच्या आधारावर किमान 2 आठवडे अगोदर आरोग्याविषयी
पूर्व अंदाज देणारी प्रणाली विकसित करणे शक्‍य
- त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला या आजारांना नियंत्रित
ठेवण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांचा साठा करणे शक्‍य.

'मलेरिया आणि अतिसाराशी संबंधित आरोग्यावरील भार भारतात विशेषत: मुलांमध्ये आहे. या अभ्यासामध्ये हवामान अंदाजानुसार प्राप्त झालेल्या हवामान-आरोग्यविषयक माहितीच्या आधारावर 2 ते 3 आठवड्या पूर्वीच या पावसाळी आजारांची कल्पना दिली जाऊ शकते. त्यामुळे आरोग्य खात्यालाही त्यानुसार कार्य करणे सोपे होईल. तसेच सामान्य नागरिकांना देखील योग्य ती खबरदारी घेता येईल."
- डॉ. अतुल कुमार सहाय, शास्त्रज्ञ- आयआयटीएम

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com