Coronavirus : कोरोनाच्या औषधांसाठी लसणाची मात्रा;नैसर्गिक तेलामुळे विषाणूचे रंध्रे होतात बंद

Coronavirus : कोरोनाच्या औषधांसाठी लसणाची मात्रा;नैसर्गिक तेलामुळे विषाणूचे रंध्रे होतात बंद

पुणे - कोरोनाला कारणीभूत "सार्स कोविड-2' या विषाणूचे रंध्र (रिसेप्टर) लसणातील नैसर्गिक तेलामुळे बंद होतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. व्हिएतनाम येथील हुई विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी "मॉलिक्‍यूलर डॉकिंग' तंत्रज्ञानाच्या साह्याने हे संशोधन केले आहे. 

एका संगणकीय सिम्युलेशनच्या आधारावर झालेले हे संशोधन कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्‍वास शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. एसीएस ओमेगा या शोधपत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. यापूर्वीही एचआयव्ही संदर्भातील संशोधनासाठी लसणातील नैसर्गिक तेलावर संशोधन करण्यात आले होते. लसणात आढळणाऱ्या 18 पैकी 17 तेलांच्या प्रकारातील सल्फर संयुगे सार्स कोविड-19 विषाणूची कार्यक्षमता 96.6 टक्‍क्‍यांनी कमी करत असल्याचा दावा शोधनिबंधात करण्यात आला आहे. डॉकिंग आधारित सिम्युलेशनच्या अभ्यासाच्या प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या आवश्‍यक आहेत. 

असे झाले संशोधन 
- सार्स कोविड -19 या विषाणूला मानवी पेशीबरोबर अभिक्रिया करण्यासाठी त्याच्या आवरणावरील ग्लायकोप्रोटिन प्रवृत्त करते. 
- ग्लायकोप्रोटिनसोबत मानवी पेशीतील ऍन्जिओटेंसिन कन्व्हर्टिंग एन्झाइम-2' (एसीइ-2) नावाचे प्रथिने विषाणूंच्या प्रवेशाला कारणीभूत असते. 
- कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर, या एसीई-2 या प्रथिनालाच निष्क्रिय करायला हवे 
- शास्त्रज्ञांनी वर्ल्डवाईड प्रोटिन डेटा बॅंकेतून एसीई-2 आणि पीडीबी6एलयू7' (प्रथिनांच्या विघटनासाठी कारणीभूत घटक) या प्रथिनांची त्रिमितीय रचना मिळविली. 
- लसणातील नैसर्गिक तेलाची (इसेंशियल ऑइल) जीसी-एमएस तंत्रज्ञानाने माहिती मिळवली 
- मॉलिक्‍युलर डॉकिंग तंत्रज्ञानाने लसणातील तेलाची एसीई-2 आणि पीडीबी6एलयू7 या दोन प्रथिनांसोबत अभिक्रिया सिम्युलेशन तंत्रज्ञानाने अभ्यासण्यात आली. 
- लसणात आढळणारी 17 रसायने एसीई-2 आणि पीडीबी6एलयू7 या प्रथिनांना निष्क्रिय करतात हे सिद्ध झाले. 

संशोधनाच्या मर्यादा 
- संशोधन केवळ संगणकीय सिम्युलेशनवर आधारित 
- प्रत्यक्ष जैविक अभिक्रियांचा अभ्यास नाही 
- सार्स कोविड-19 वर औषध शोधण्यासाठी दिशादर्शक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com