लोकसहभागातून शास्रज्ञांनी शोधले राक्षसी कृष्णविवर: नारायणगावातील GMRTचा सहभाग

जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) सह अनेक आंतरराष्ट्रीय दुर्बिणींच्या सहभागातून एका दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटनेचा शोध लागला आहे.
Galaxy
GalaxySakal
Summary

जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) सह अनेक आंतरराष्ट्रीय दुर्बिणींच्या सहभागातून एका दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटनेचा शोध लागला आहे.

पुणे - सार्वजनिक स्वच्छतेपासून ते जलसंधारणापर्यंतची अनेक कामे लोकसहभागातून झाल्याची आपण पाहिले असतील. पण भारतीय शास्रज्ञांनी लोकसहभागातून चक्क एक राक्षसी कृष्णविवरासोबतच त्याच्याभोवती फिरणाऱ्या एका दुर्मिळ दीर्घिकेचा शोध घेतला आहे.

नारायणगांव जवळील जायंट मिटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) सह अनेक आंतरराष्ट्रीय दुर्बिणींच्या सहभागातून एका दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटनेचा शोध लागला आहे. या संशोधनाचे नेतृत्व मुंबई विद्यापीठाचे डॉ. आनंद होता, फ्रान्स येथे कार्यरत डॉ. प्रतीक दाभाडे (पॅरिस), अमेरिकेतील अरेसिबो वेधशाळेच्या डॉ. श्रावणी वड्डी यांनी केले आहे. डॉ. होता हे आरएडीॲटहोम RAD@home) खगोलशास्त्र सहयोगशाळेचे संस्थापक आहेत. ज्याद्वारे सर्वसामान्य लोकांनी थेट संशोधनात सहभाग घेतला. शास्रज्ञांनी शोधलेले कृष्णविवर ‘आरएडी१२’ नावाच्या दीर्घिकेत वसलेलं आहे. नुकतेच हे संशोधन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या लेटर्स ऑफ द मंथली नोटीसमध्ये प्रकाशित झाले आहे.

असा लागला शोध..

स्लोअन डिजिटल स्काय सर्वेक्षणातील ऑप्टिकल डेटा आणि व्हेरी लार्ज अरे (व्हीएलए) मधील रेडिओ डेटाचा शास्रज्ञांनी एकत्र वापर केला. तेंव्हा २०१३ मध्येच त्यांना ‘आरएडी १२’ नावाच्या दीर्घीकेत गोंधळात टाकणारे निरीक्षणे मिळाली होती. म्हणून जीएमआरटीद्वारे या दीर्घीकेचा मागोवा घेऊन निरीक्षण केल्यावर त्याचे असे विलक्षण स्वरूप प्रकट झाले. ज्यामध्ये शास्रज्ञांनी केंद्रस्थानी कृष्णविवर असणारी अशी एक दीर्घिका शोधली आहे. जिच्या केन्द्रस्थानातून निघणारा ऊर्जात्मक कारंजे (जेट) हे एका विशिष्ट प्रकारे शेजारच्या दीर्घिके पर्यंत पोहोचलेले दिसतो. हे कारंजे साधारणतः रेडिओ लहरी उत्सर्जित करतात आणि फक्त रेडिओ दुर्बिणी द्वारे अभ्यासले जातात.

विशेष काय?

असे रेडिओ जेट साधारणपणे दीर्घिकेच्या दोन्ही बाजूला असतात, परंतु या प्रकरणात, जेट एकाच बाजूला दिसते, जे चकित करणारे आहे. अशा रेडिओ जेट च्या प्रभावामुळे दीर्घिकेतील नवीन ताऱ्याच्या निर्मितीवर प्रभाव पडतो, असे इतर काही खगोलशात्रीय निरीक्षणामधे पाहण्यात आले आहे. कृष्णविवरातून साधारणतः परस्पर विरोधी कारंजी उधळलेली पाहायला मिळतात. पण हे कृष्णविवर केवळ शेजारील दीर्घिकेच्या दिशेने एकाच कारंजे फेकते आहे. दुसरीकडील (विरुद्ध) कारंज्याचे काय झाले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com