भंगार गोळा करणारा फिडर बॉक्सला चिकटून जागीच खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Feeder Box

उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्हॅटच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणारा जागीच खाक झाली असल्याची घटना घडली.

भंगार गोळा करणारा फिडर बॉक्सला चिकटून जागीच खाक

धायरी - वडगाव धायरीत उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्हॅटच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणारा जागीच खाक झाली असल्याची घटना घडली.

सोमवारी दिनांक २२ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. शफीक बशीर कुरेशी (वय-३९,रा-शंकर मठ, मिरेकर वस्ती, हडपसर पुणे)असे मृत्यु झालेल्या व्यक्तीची नाव आहे.

कुरेशी हा हडपसर इथून भंगार गोळा करण्यासाठी आला होता.भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनला शेजारी असणाऱ्या उच्चा दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणारा जागीच खाक झाली असल्याची घटना घडली.शफीक त्याच्या लुना या दुचाकीवरून  हडपसर येथून येऊन भंगार गोळा करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शफीक याला १२वर्षाचा मुलगा आणि८ वर्षाशची मुलगी व पत्नी विकलांग असल्याचे सांगितले. कुटुंबातील शफीक हा एकटाच भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवत होता. यापुढे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण कसे होणार असा प्रश्न आता शफीकच्या कुटुंबियांना पडला आहे.

यावेळी सिंहगड पोलीस निरीक्षक शैलेश संखे, प्रमोद वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलिस हवालदार किशोर कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेऊन.सदर इसमास शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सिंहगड पोलिस करीत आहे.

Web Title: Scrab Collection Electric Shock Feeder Box Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..