

Fire Breaks Out at 2 AM, Scrap Shop Reduced to Ashes in Vadgaon Nimbalkar
esakal
-चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील निरा-बारामती मार्गालगत भरलोक वस्तीत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत दुकानातील भंगार साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.