वाहनाच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध

Indicator
Indicator

पिंपरी - चिंचवड येथील अंकिता अशोक नगरकर आणि रत्ना पाटील या दोन मैत्रिणींनी वाहनांच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध लावला आहे. वाहनाच्या छतावर बसविता येणाऱ्या या आधुनिक इंडिकेटरचे त्यांनी पेटंट नोंदविले आहे. अंकिताचे आतापर्यंतचे हे दहावे पेटंट आहे.

आधुनिक इंडिकेटरचे फायदे सांगताना अंकिता म्हणाली, ‘‘प्रचलित वाहनांना इंडिकेटर चार ठिकाणी लावलेले असतात. आम्ही शोधलेला इंडिकेटर हा गाडीच्या छतावर दोन्ही बाजूला एलईडी बल्बच्या पट्टीच्या स्वरूपात आहे. ज्या बाजूला वळायचे आहे, ती पट्टी ब्लिंक होते. हे इंडिकेटर वाहनांच्या छतावर बसवलेले असल्याने ट्रकसारख्या उंच वाहनचालकांना देखील स्पष्टपणे दिसून येते. यामुळे अपघातांत घट होईल. कंपनीने वाहनांना बसविलेल्या इंडिकेटरसोबतच हे छतावरचे इंडिकेटरदेखील चांगले कार्य करेल. अल्प खर्चात व कमी वेळेत हे इंडिकेटर बसविता येते. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार पिवळा रंग व त्यावर असणाऱ्या प्लॅस्टिक कव्हरमुळे प्रकाशाची तीव्रता प्रमाणात आहे. हा इंडिकेटर जगभरात वापरला जाण्याची शक्‍यता आहे.’’

रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातांतून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तसेच, अपघातातून येणारे अपंगत्व हे संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाययोजना करणे व त्यासंबंधित संशोधन करणे, हे कार्य शास्त्रज्ञ अविरतपणे करीत आहेत. यात खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यापूर्वी माझ्या स्टेपलरच्या संशोधनासह इतर नऊ पेटंट रजिस्टर आहेत, असे अंकिता नगरकरने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com