karnataka Hapus Mango
sakal
मार्केट यार्ड - गुलटेकडी मार्केट यार्डात कर्नाटकातून हापूस आंब्याची पहिली आवक झाली आहे. दरवर्षी कोकणातून पहिली आवक होत असते. रोहन सतीश उरसळ यांच्या गाळ्यावर कर्नाटक येथील शेतकरी जी. एम. शफीउल्ला यांच्या शेतातून सहा पेट्यांची आवक झाली. चार डझनाच्या पेटीला लिलावात ५ हजार १०० रुपये भाव मिळाला.