sharad pawar ajit pawar
Sakal
पुणे - महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे. त्यामध्ये जागा वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीसाठी एकत्र येण्यासंदर्भातील घोषणा शुक्रवारी होण्याऐवजी आता रविवारी होण्याची शक्यता आहे.