
ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
पुणे : सिरमने उत्पादित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही कोरोनावरील दुसरी लस जून महिन्यात बाजारात येईल, असा विश्वास सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये ही लस ८९.३ टक्के परिणामकारक (इफिकसी) असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुनावाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
- पुण्यातील मुख्याध्यापिकेने केली 'शाळा'; तारण ठेवलेली फ्लॅट आणि शेतजमीन परस्पर टाकली विकून
अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने विकसित केलेल्या या लशीच्या भारतातील चाचण्यांसाठी सिरम इन्स्टिट्यूटने या आधिच परवानही मागितली आहे. पूनावाला ट्वीटमध्ये म्हणतातत, ‘‘आमची सहयोगी कंपनी असलेल्या नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या कोरोना लशीची परिणामकारकता चांगली असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. आम्ही भारतातही चाचण्यांसाठी अर्ज केला असून, आम्हाला आशा आहे की जून २०२१ ला आम्ही कोव्होव्हॅक्स बाजारात उपलब्ध होईल.’’
- 'हम सब एक है, मोदी-शहा फेक है!'
ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन संदर्भात अधिकृत आकडेवारी येणे बाकी आहे. एप्रिलपर्यत सिरम कोव्होव्हॅक्सचे उत्पादन महिन्याला चार ते पाच कोटी मात्रांपर्यंत नेण्याची शक्यता आहे. भारतामध्ये आजपर्यंत ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकाच्या कोव्हिशिल्ड लसीला जिचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करते आणि भारत बायोटेकच्या स्वदेशी
कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे.
- PMC Budget 2021-22 : पाचशे इलेक्ट्रीक बस खरेदी करणार
Our partnership for a COVID-19 vaccine with @Novavax has also published excellent efficacy results. We have also applied to start trials in India. Hope to launch #COVOVAX by June 2021!
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 30, 2021
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)