esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पाचशेच्या आत रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.५) सलग दुसऱ्या दिवशी पाचशेच्या आत आली आहे. जिल्ह्यात दिवसांत ४३४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून याउलट ६२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील १६२ रुग्ण आहेत.

दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत शहरातील रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ७५ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १५३, नगरपालिका हद्दीतील ३४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गुरुवारपासून होणार खुली; डॉ. राजेश देशमुख

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १६७, पिंपरी चिंचवडमधील ६४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३४०, नगरपालिका हद्दीतील ४५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जणांचा समावेश आहे. दिवसांत पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा तर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

loading image
go to top