शिरूरमधील या गावात कोरोनाचा दुसरा बळी

corona1
corona1
Updated on: 

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एका कोरोनाबाधित ज्येष्ठ पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी आज दिली. 

तळेगाव ढमढेरे येथील मृत नागरिकास गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. संबधित रुग्णावर पुण्यात खासगी दवाखान्यात उपचार चालू होते. कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. यापूर्वी तळेगावातील एका ज्येष्ठ महिलेचा मे महिन्यात कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, आज आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे आतापर्यंत गावातील दोघांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या तळेगावातील ६ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. 
 


प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव ढमढेरे गाव प्रतिबंधित व बफर क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तळेगावात कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने खबरदारीचे उपाय योजून, लॉकडाउन कडक केले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर व पोलिस पाटील पांडुरंग नरके यांनी दिली. त्यानुसार गावातील सर्व दुकाने व इतर व्यवसाय सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहेत. तसेच, गावाबाहेरचे भाजी विक्रेते व इतर वस्तू विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुपारी दोननंतर कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे. लॉकडाउनचे नियम सर्वांनी पाळून कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस पाटील पांडुरंग नरके व पोलिसांनी केले आहे.
 
Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Giant Radio Pulses Detected by Pune GMRT From a Star Spinning 592 Times Per Second in a Major Astronomy Discovery
MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Marathi News Esakal
www.esakal.com