esakal | पुणे विद्यापीठाला दुसऱ्या लाटेचा फटका, सहा जणांचा बळी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठाला दुसऱ्या लाटेचा फटका, सहा जणांचा बळी

पुणे विद्यापीठाला दुसऱ्या लाटेचा फटका, सहा जणांचा बळी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात हाहाकार माजविलेला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला याचाही जोरदार फटका बसला आहे. आतपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून, परीक्षा विभाग लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असताना मृतांमध्ये या विभागातील तिघांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी अनेक प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सुरक्षीत होते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये शासनाचे आदेश येईपर्यंत विद्यीपाठातील कामकाज जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू होते. त्याच काळात अनेक कर्मचारी, अधिकारी यांना लागण झाली. शासनाच्या आदेशानंतर विद्यापीठाने विद्यापीठात प्रवेश बंद केला. ज्यांची कामे असतील त्यांनी ऑनलाइन करावीत असे आदेश दिले होते. केवळ वित्त विभाग आणि परीक्षा विभागाची कामे पूर्ण क्षमतेने सुरू होती.

हेही वाचा: जावयाने सासूसोबतच मांडला संसार; बिनसल्यावर उचललं टोकाचं पाऊल

या दुसऱ्या लाटेत सहा जणांचा बळी गेला आहे. यामध्ये समीर नेवकर (वित्त विभाग), विश्वास आव्हाड (भूगोल विभाग), गजेंद्र तारडे (परीक्षा विभाग), शंकर भालेराव (परीक्षा विभाग), संजय गायकवाड (परीक्षा विभाग), प्रभाकर शिरसे (स्थावर विभाग), यांचा समावेश आहे. विद्यापीठातील वसाहतीमध्ये राहणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची सोय गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली आहे.

कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विद्यापीठाच्या सहा कर्मचाऱ्यांचा जणांचा बळी गेला आहे. या लाटेतून विद्यापीठातील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय सुरक्षीत रहावेत यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. जे कुटुंब बाधित झाले आहे त्यांच्यासाठी गेस्ट हाऊसमधील रूम उपलब्ध करून दिले आहेत. तसेच उपचारासाठी ॲडव्हान्स देखील दिला जात आहे.

loading image