esakal | पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ११ एप्रिलपासून ओहोटी सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने ओहोटी लागली आहे. दिवसातील कोरोना रुग्णांची संख्या ११ एप्रिलपासून सातत्याने कमी होऊ लागली आहे. सोमवारी (ता.२६) ही संख्या २ हजार ५३८ झाली आहे.

कोरोना रुग्णांची आजची संख्या ही पंधरा दिवसांपूर्वीच्या सर्वाधिक रुग्णांच्या तुलनेत ४ हजार ४७२ ने कमी झाली आहे. १ मार्च २०२१ नंतर पुणे शहरात ८ एप्रिलला एकाच दिवसात सर्वाधिक ७ हजार १० नवे कोरोना रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत नवे रुग्ण सातत्याने कमी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात आज ६ हजार ४४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील रुग्णांसह पिंपरी चिंचवडमधील १ हजार २९३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ८८४, नगरपालिका क्षेत्रातील २७७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५४ नवीन रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात ८ हजार ८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अन्य १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एकूण मृत्यूमध्ये शहरातील ५६ मृत्यू आहेत.

हेही वाचा: Pune Corona Update: सलग आठव्या दिवशी नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट

पुणे शहरातील कोरोना रुग्ण संख्येचा चढ-उताराचा आलेख

(ता. १ मार्च ते आजतागायत)

- १ मार्च - ४०६

- ७ मार्च - ९८४

- १४ मार्च - १७४०

- २१ मार्च - २९००

- २८ मार्च - ४४२६

- ४ एप्रिल - ६२२५

- ८ एप्रिल - ७०१०

- ११ एप्रिल - ६६७९

- १८ एप्रिल - ५३७३

- २५ एप्रिल - ४६३१

- २६ एप्रिल - २५३८

loading image