विद्यार्थ्यांनो, पुणे विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय; द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

-क्रेडिट सिस्टीम लागू होणार
- प्रात्यक्षीक, प्रयोगशील शिक्षणावर भर 
- विद्यापरिषदेच्या बैठकीत निर्णय

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला असून, यंदा पासून या विद्यार्थ्यांना क्रेडिट चॉईस बेस सिस्टीमनुसार मूल्यमापन केले जाणार आहे. अनेक नवीन अभ्यासक्रम ही सुरू करण्याचा निर्णय आज विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाची विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.  विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतर-विद्याशाखीय अभ्यास या चारही विद्याशाखांचे प्रस्ताव ठेवण्यात आले. 
विद्यापीठाने गेल्या वर्षी प्रथम वर्षाला क्रेडिट सिस्टीम सुरू केली होती, यंदा द्वितीय वर्षाला लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बीए, बीकाॅम, बीएससी, एमए, एमकाॅम, एमएससी, इंजिनीयरींग, आर्किटेक्चर, एमबीए, फार्मसी यासह सर्वच पदवी व पदव्युत्तर पदवीच्या द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम बदलण्यास मान्याता देण्यात आली आहे. यासह आठ ते दहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आला पाहिजे, त्यांन रोजगारक्षम, नवीन कल्पनांचा विकास करता यावा अशी पद्धतीने शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले आहेत, असे प्र-कुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत नविन प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल सुचविले आहेत, असे अधिष्ठाता डाॅ. मनोहर चासकर यांनी सांगितले.

 बारामतीतील माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ जण गुदमरले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The second year syllabus of Pune University has changed