
विधानसभा निवडणूक झाल्यापासून जल्लोषाची तयारी केली असतानाच मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पुणे : विधानसभा निवडणूक झाल्यापासून जल्लोषाची तयारी केली असतानाच मतमोजणीच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर कोल्हापूरात विजयी मिरवणूकांना बंदी घालण्यात आली आहे.
"पुणे : 'या' मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना जिंकण्याचा विश्वास; फ्लेक्सबोर्ड छापून तयार
पुणे शहरातील 8 मतदारसंघासाठी झालेल्या विधानसभा मतदानाची मतमोजणी आज (ता. 24) होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदानादिवशीपासूनच काही उमेदवारांच्या विजयाचे फ्लेक्स लागले गेले, आज विजयी मिरवणूका काढण्याचे नियोजन राजकीय पक्षांनी केले. त्याआधीच खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यापासूनच हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. पाटलांचे तसेच खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यानी फ्लेक्स लावले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.