

Major Confusion After Section Chart Error in Voter List
Sakal
पुणे : मतदार यादीची फोड करताना सॉफ्टवेअरमध्ये सेक्शन चार्टचे नाव देताना चुकीचे नावे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे मतदार यादीतील मतदारांची पळवापळवी झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, ही चूक निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये असल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान मतदार यादीवर आत्तापर्यंत ४१९ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली आहे. या यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.