
पुणे : भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सेक्युलर समाज निर्मितीसाठी प्रबोधनात्मक व आंदोलनात्मक काम करणाऱ्या सेक्युलर मूव्हमेंट संघटनेने शनिवार (ता. १४) आणि रविवारी (ता. १५) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात हे अधिवेशन होणार आहे.