पुणे - कोंढवा येथील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सोसायटीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत..आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीत प्रवेश मिळवत हा प्रकार केला आहे. त्यामुळे सोसायटीत येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवण्याची आपली यंत्रणा सक्षम आहे का? आपल्या सोसायटीमधील सुरक्षारक्षक किती दक्ष आहेत का? सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही सुरू आहेत का? सोसायटीत ये-जा करणाऱ्यांची नोंद केली जाते का? याची चाचपणी आता अनेक सोसायटींनी सुरू केली आहे..या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, ‘गेटेड कम्युनिटी’सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा घटना होत असतील तर सुरक्षाव्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा संदर्भ घेत सोसायटीच्या सुरक्षेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ‘केवळ गेटवर सुरक्षारक्षक गार्ड असला की सुरक्षा पूर्ण होते का?’ हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे..या मुद्यांवर होतेय चर्चा -- सीसीटीव्ही कॅमेरे अद्ययावत नसतात किंवा त्यांची निगराणी नियमित होत नाही- ओळखीचे असल्यामुळे पाहुण्यांची तपासणी टाळली जाते- काही सोसायट्यांमध्ये बायोमेट्रिक किंवा डिजिटल एंट्री सिस्टीम नसते- सुरक्षा रक्षकांना कोणतीही तांत्रिक किंवा मानसिक प्रशिक्षण दिले जात नाही.पोलिस व सोसायटीतील समन्वय वाढावा -पोलिस प्रशासन आणि सोसायटी व्यवस्थापन यांच्यात समन्वय वाढवून, कडक सुरक्षा नियम लागू करणे, तांत्रिक उपायांचा वापर आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे हे आता काळाची गरज बनली आहे, अशी अपेक्षा काय सोसायट्यांनी व्यक्त केली आहे..डिलिव्हरी बॉयने गैरप्रकार केल्याची घटना नुकतीच आमच्या सोसायटीत घडली आहे. त्यामुळे याबाबत आम्ही काही नियमावली केली आहे. तसेच सुरक्षारक्षकाला शक्यतो घरात प्रवेश देवू नये. घरात कोणी लहान बाळ किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्याचे पार्सल गेटवरच ठेवावे, अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी देखील सतर्क होणे गरजेचे आहे.- अनिकेत भोर्इटे, सचिव, सिट्रॉन सहकारी गृहरचना संस्था, वाघोली.सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही या दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात. आमच्या सोसायटीत लिफ्टमध्ये सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सर्व हालचालींची नोंद होते. सुरक्षारक्षक आणि सुरक्षा यंत्रणा ही दक्ष असेल तर अशा प्रकारांना आळ बसू शकतो. आपल्या सोसायटीत कोणी अनोळखी व्यक्ती आली तर त्याबाबत सर्वच सदस्य सतर्क असतील गैरप्रकार कमी होतील किंवा ते पूर्णपणे टाळले जाऊ शकता.- प्रथमेश कुलकर्णी, अध्यक्ष, वरुण पवन गृहनिर्माण सोसायटी, डीएसके विश्व.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.