पुण्यातही ज्ञानवापी? मनसेच्या इशाऱ्यानंतर शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात | Gyanvapi Masjid Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gyanvapi Masjid Case

पुण्यातही ज्ञानवापी? मनसेच्या इशाऱ्यानंतर शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच पेटला आहे. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. मंदिराच्या जागी ही मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांनी केलाय. आता पुण्यातही मनसेचे असाच दावा करत पुण्येश्वराचं देऊळ मशिदीपासून मुक्त करणार असल्याचं सांगितलं.

हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याच्या ठिकाणी पुण्येश्वराचं मंदिर होतं असा दावा मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिद बांधल्याचा दावा त्यांनी मनसेनेकडून करण्यात आला आहे. (Gyanvapi Masjid Case)

त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा: पुण्यातही 'ज्ञानवापी?'; मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशीद बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच पुण्यातल्या या मंदिरांच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं. राज ठाकरे यांच्या सभेच्या आधी नेत्यांची भाषणं सुरू होती. यावेळी शिंदेंनी घोषणा केली.

पुण्यातील सभेत बोलताना अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वरालाही मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिल्जीचा बडा अरब हा सरदार पुण्यावर चाल करून आला, त्यावेळी त्यानं भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. फक्त एकच नाही तर पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरं उध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे तर दुसरं लालमहालाच्या थोडं पुढे आहे. आज तिथं छोटा शेख दर्गा आहे. सगळ्या मंदिरांच्या वर या मशिदी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुण्येश्वराच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Security Of Punyeshwar Temple And Salahudin Dargah Increases After Mns Warning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj Thackeray