Pune News : शिफारशीच्या भरतीमुळे सुरक्षा यंत्रणा 'कमकुवत'; महापालिका आयुक्तांच्या उत्तराने नगरसेवकांची कोंडी

महापालिकेत सभागृहाच्या दारापर्यंत येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेत सुरक्षा व्यवस्थेचे काढले वाभाडे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - महापालिकेत सभागृहाच्या दारापर्यंत येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेत सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. आपले सुरक्षा रक्षक काय करत असतात असा प्रश्न विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ‘‘हे सुरक्षा रक्षक शिफारशीने नियुक्त केल्याने सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे,’’ असे उत्तर दिल्याने नगरसेवकांचीच कोंडी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com