महत्वाची बातमी : लॉकडाउनचा पाचवा टप्पा; पुण्यात काय सुरू, काय बंद वाचा सविस्तर

pune-j.jpg
pune-j.jpg

पुणे : नव्या लॉकडाउमध्ये काही सवलती देतानाच मास्क न बांधता रस्त्यांवर येणाऱ्या पुणेकरांना मात्र पाचशे रुपयांचा दंड मोजावा लागणार आहे. दुसरीकडे, बाधित क्षेत्रातील अत्यावश्‍यक सेवांसह त्याबाहेरील सर्व दुकाने उघडणार आहेत. त्याशिवाय उद्यानेही खुली होणार आहेत. मात्र, सलून दुकाने, मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृह, क्रीडांगणे, जलतरण तलाव बंद राहणार आहेत. लॉकडाउन-5 बाबतचे नवे आदेश महापालिका आयुक्त शेखर गाकवाड यांनी मंगळवारी काढले. त्यावर बुधवारपासून (ता. 3) अंमलबजावणी होईल.

दरम्यान, ज्या भागांतील व्यवहारांना परवानगी आहे; तेथील व्यावसायिकांसह कामगार, ग्राहकांनी सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यातही नागरिकांना वैयक्तिक सवलती दिल्या आहेत.  

दरम्यान, त्याचाच भाग म्हणून "मॉर्निंग वॉक'साठी उद्याने सुरू केली जाणार असून, बाधित क्षेत्रातील उद्याने बंद ठेवण्यात येणार आहेत. जुन्या बाधित क्षेत्रातील 27 भाग वगळले असून, नव्याने 28 ठिकाणे जोडली गेली आहेत. बाधित क्षेत्रांतील आजवर बंद असलेली अत्यावश्‍यक सेवांची दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू राहतील. या क्षेत्राबाहेरील सर्व दुकाने, वर्कशॉप, गॅरेज दिवसाआड सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महात्मा फुले मंडईसह अन्य मंडई सुरू राहणार असून, तुळशीबागेतील दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.मात्र हे व्यवव्हार दिवसाआड सुरू करता येणार आहेत, मंडई सम क्रमांकाचे दुकाने सम आणि विषय क्रमाकाची दुकाने विषयम सारखेला सुरू ठेवता येणार आहेत. हॉंगकॉंग लेनही सुरू दिवसाआड सुरू राहील. 

बाधित क्षेत्र 
-दवाखाने, मेडिकल, किरणा दुकाने, दूध भाजी विक्री परवानगी (सकाळी 9 ते दुपारी 2) 
-अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्या कोणाला ये-जा करता येणार नाही 
-महापालिकेचे कर्मचारी, सेवा पुरविणारी वाहने, रुग्णवाहिकांना परवानगी 
 

बाधित क्षेत्राबाहेर 
-व्यायामांसाठी परवानगी, उद्याने, मैदाने, सोसायट्यांचा आवार, घराजवळील ठिकाण, सायकलिंग (नियमानुसार) 
-सार्वजनिक ठिकाणे विशेष मोकळ्या जागांवर गर्दी करण्यास परवानगी नाही 
े-प्लंबर, विद्युत, पेस्ट कंट्रोल आणि अन्य व्यावसाय करता येणार 
-किमान 15 कर्मचाऱ्यांत सरकारी कार्यालय सुरू करता येणार 
- सरकारी आणि खासगी कार्यालये सरकारांच्या नियमानुसार सुरू राहणार 
- दोन पथारी व्यावसायिकांमधील 5 मीटर हवे 

काय केले आवाहन- 
65 वर्षोंपेक्षा अधिक आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घराबाहेर येण्यास बंदी (अत्यावश्‍यक सेवा) 
खरेदी करताना 6 फूट अंतर ठेवावे, घराजवळ खरेदी करावी 
सायकलचा वापर करावा 

वाहतूक परवनागी 
-टॅक्‍सी/कॅब (अत्यावश्‍यक सेवा) वाहनचालक आणि अन्य दोन व्यक्ती 
-रिक्षा (अत्यावश्‍यक सेवा)वाहनचालक आणि दोन व्यक्ती 
-चारचाकी स्वयंचलिक वाहन (अत्यावश्‍यक सेवा) वाहनचालक आणि दोन व्यक्ती 
दुचाकी (अत्यावश्‍यक सेवा) एक व्यक्ती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com