esakal | 'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद

'युट्युब' पाहून एटीएम फोडणारा मुलगा जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर : यु ट्युबवर पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या अल्पवयीन मुलाला शिरूर पोलिसांनी शनिवारी (ता. ११) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यासमोरील स्टेट बॅंकेचे एटीएम (state bank atm) फोडून त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न तो करीत होता.

या सोळा वर्षीय मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. या मुलाचे वडील एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक आहेत. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे हे पोलिस नाईक प्रताप टेंगले, होमगार्ड सुनील चोरे यांच्यासह गस्त घालीत असताना त्यांना शहरातील स्टेट बॅंकेच्या एटीएम जवळ हुडी घातलेला व तोंडाला मास्क लावलेला मुलगा संशयास्पदरीत्या फिरताना दिसला.

हेही वाचा: अनोळखी व्यक्तीचा गळा आवळून खून! माढा तालुक्‍यातील शेवरे येथील घटना

पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिस पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. शेअर मार्केट मध्ये गुंतविण्यासाठी पैशांची गरज असल्याने यु ट्युबवर पाहून हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली संबंधित मुलाने दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

loading image
go to top