आज कळणार जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती...      

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

निवडणुकीसाठी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत चारही सभापतीची नावे जाहीर होतील.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या चार सभापतींच्या निवडी आज (ता. २४) दुपारी केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे.

निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे या दुपारी साडेचार वाजता सर्व सभापतींना समितीनिहाय कामकाजाचे वाटप करणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समित्या आहेत. यापैकी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडे प्रत्येकी दोन समित्यांचे सभापती पद असते. सामाजिक न्याय आणि महिला व बालकल्याण या दोन समित्यांसाठी स्वतंत्र निवडणूक होत असते. अन्य चार विषय समित्यांच्या दोन सभापती पदासाठी केवळ सभापती म्हणून एकत्र निवडणूक होत असते. त्यामुळे या सभापतींना निवडीनंतर अध्यक्ष हे समितीचे वाटप करत असतात.  

दिल्ली निवडणुकीत पाकिस्तानची एंट्री

दरम्यान, या निवडणुकीसाठी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत चारही सभापतीची नावे जाहीर होतील. दुपारी तीन वाजता अधिकृत घोषणा होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of four chairmen of the subject committees today