फॅब्रिअनो महोत्सवात रंगणार पुणेरी अविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

painter

फॅब्रिअनो महोत्सवात रंगणार पुणेरी अविष्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : चित्रकारांची मांदियाळी असलेल्या इटलीतील फॅब्रिअनो अँक्वारीलो परिषदेत पुण्याचे रहीवासी असलेले दर्यावर्दी कॅप्टन प्रफुल्ल हुडेकर आपल्या जलरंग शैलीचे सादरीकरण करणार आहेत. जगभरात दरवर्षी कलेच्या क्षेत्रात अनेक महोत्सव, प्रदर्शने, कार्यशाळा होत असतात. इटलीमधील फॅब्रिअनो शहर हे जलरंग चित्रकलेची पंढरी म्हणूनच ओळखली जाते. वर्षभर इथे जलरंग चित्रकार आपली कला सादर करण्यासाठी तसेच नवीन काही तंत्र शिकण्यासाठी येत असतात. अनेक जागतिक दर्जाचे चित्रकार, व्यावसायिक, चित्र संग्रहक , विद्यार्थी यांचे एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजेच फॅब्रिअनो शहर. जलरंगातील चित्रकलेच्या वृद्धीसाठी, कलाकारांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने  2010  सालापासून फॅब्रिअनो येथे फॅब्रिअनो अँक्वारीलो ही परिषद भरवली जाऊ लागली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

दरवर्षी येथे दिग्गज चित्रकारांकडून कार्यशाळा घेतल्या जातात. नवोदित कलाकारांना ही पर्वणीच असते. गेल्या वर्षी 75 देशातल्या 2500 चित्रकारांनी ह्या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला होता. भारतातूनही ह्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी चित्रकार प्रयत्न करत असतात. यासाठीची निवड प्रक्रियाही स्पर्धात्मक पण प्रोत्साहन देणारी असते. चित्रकारांना मार्गदर्शक म्हणून प्रवीण करमरकर, राहुल चक्रवर्ती, रजतसुभ्रा बंडोपाध्याय, पूजा कुमार, शिखा गर्ग हे काम पाहतात.

हेही वाचा: लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट

हरहुन्नरी जलरंग चित्रकार असलेल्या हुडेकर याना फॅब्रिअनो येथे प्रात्यक्षिक देण्याची पहिली संधी 2019 साली मिळाली. त्या संधीचे सोनं करत त्यानी आपली चित्रकला बहरवलीच, पण अनेक चित्रकारांना मार्गदर्शनही करू लागले, त्याचीच परिणती फॅब्रिअनोच्या ह्या वर्षीच्याही सादरीकरनासाठी आमंत्रण मिळण्यात झाली. हा खरंच शिरपेचात मानाचा अजून एक तुरा खोवल्यासारखेच आहे. चार जून रोजी दुपारी बारा वाजता त्यांचे जलरंग चित्रकलेचे प्रात्यक्षिक ऑनलाईन पध्दतीने होईल. आपण त्यात नक्की सहभागी होऊ शकतो फॅब्रिनोमध्ये मिलिंद मुळीक , सुब्रतो बंडोपाध्या, प्रफुल्ल सावंत राजेश सावंत, प्रवीण करमरकर ,संजय देसाई ,राहुल चॅटर्जी, यांचे जलरंग प्रात्यक्षिक आतापर्यंत 2017 ते 2020 या वर्षात झाली आहेत.

समुद्रामध्ये असताना फावला वेळ मिळाला की मी चित्रकलेत रमतो.. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने मी या प्रवाहात सहभागी झालो. कलाकारांसाठी जगभरात अनेक उपक्रम सुरू असतात पण माहिती अभावी अनेक प्रतिभासंपन्न कलाकार अशा आनंददायी उपक्रमापासून दूर राहतात.-प्रफुल्ल हुडेकर

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

loading image
go to top