पुण्यातील तरूणाने घेतली युरोपियन भरारी

कैलास गावडे
Tuesday, 15 September 2020

 केशवनगर-मुंढवा येथील पुष्पहार व्यावसायिक बाळासाहेब शेळके यांचे मुलगा प्रसाद शेळके याची संयुक्त राष्ट्र संघ आणि युरोपियन युनियनच्या प्रोजेक्ट करिता भारतातून डाक्टरेटसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित "मेरी क्युरी फेलोशिप" अंतर्गत Early Stage Researcher म्हणून निवड झाली आहे.

मुंढवा (पुणे) : केशवनगर-मुंढवा येथील पुष्पहार व्यावसायिक बाळासाहेब शेळके यांचे मुलगा प्रसाद शेळके याची संयुक्त राष्ट्र संघ आणि युरोपियन युनियनच्या प्रोजेक्ट करिता भारतातून डाक्टरेटसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित "मेरी क्युरी फेलोशिप" अंतर्गत Early Stage Researcher म्हणून निवड झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसादने दहावीपर्यंतचे शिक्षण केशवनगर येथील मराठी माध्यमाच्या सारथी शाळा इथून पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एस.व्ही. युनियन ज्युनिअर कॉलेज इथून तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. अवकाश वातावरण आणि समुद्र या प्रति असणाऱ्या उत्सुकतेपोटी त्याने पुणे विद्यापीठात Atmospheric Science  या विषयांमध्ये एम. टेक. साठी प्रवेश मिळवला आणि एम. टेक.ची पदवी प्राप्त केली.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

पुणे विद्यापीठात असताना वातावरण आणि समुद्र यामधील विविध घटकांवर संशोधनाची आवड निर्माण झाली. या विषयांमधल्या कौशल्यामुळे त्याची Early stage researcher  म्हणून निवड झाली. सदर GMOS-TRAIN हा प्रोजेक्ट युरोपियन युनियन " हरीझॉन २०२० मानांकन प्राप्त प्रोजेक्ट असून यातून प्राप्त होणारे संशोधन संयुक्त राष्ट्र संघाच्या मर्क्युरी विषयक संशोधन होणार आहे. या प्रोजेक्टमुळे सद्यस्थितीत मरक्यूरीचे वातावरण आणि समुद्र यामधील प्रदूषणात्मक घटकांचे प्रमाण आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रोजेक्टमध्ये युरोपियन युनियनमधील सहा देश समाविष्ट असून प्रसादचे संशोधन प्रामुख्याने इटलीतील नॅशनल रिसर्च कौन्सिल इन्स्टिट्यूट ऑफ पॉल्युशन
या संशोधन संस्थेत असणार आहे.  त्याच बरोबर फ्रान्समधील University of Greenoble Alpes आणि जर्मनीच्या Helmoltz ZG नामक जगातील नामांकित संशोधन संस्थांमध्ये या संशोधनाची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रसादला संशोधनासाठी आणि डायरेक्टसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित फेलोशिप म्हणजेच "मेरी क्युरी फेलोशिप" प्राप्त झाली असून सप्टेंबर २०० मध्ये संशोधन सुरू होणार आहे. आई-वडिलांनी घेतलेल्या अमाप कष्टाचं फलित असल्याचे प्रसादच मत आहे. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायची ही जिद्द बाळगून ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं आणि या वाटेवर लाभलेल्या गुरुजनांमुळे हे स्वप्न सत्यात उतरले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection of Prasad Shelke from Pune as Early Stage Researcher