पैसे नाहीत म्हणून हार न मानता 'ते' परिस्थितीशी लढले अन् जिंकलेही...

santosh.jpg
santosh.jpg

स्वारगेट (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेमध्ये सर्व परिस्थितीवर मात करीत नुकत्याच मार्चमध्ये आलेल्या निकालात संतोष कोळी यांनी यश मिळवलं आहे. त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. संतोष बसण्णा कोळी हे मूळचे होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर येथील आहे. घरात कुठलीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना अधिकारी होण्याचा स्वप्न त्यांनी साकार केल.
प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा होनमुर्गी येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी साने गुरुजी वसतीगृहात प्रवेश घेऊन १२ वी शास्त्र शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पाहुण्यांच्या मदतीने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. तिथे शिक्षण घेत असताना निखिल नावाच्या मित्राने त्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल प्राथमिक माहिती दिली. पदवी प्राप्त करून ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आले. पण आर्थिक अडचण असल्याने त्यांच्याजवळ काम करून अभ्यास करणे हा एकमेव मार्ग असल्यामुळे अभ्यासिकेत काम करणे त्यांनी पसंत केले. २०१६ ला डिग्री पूर्ण करून ते पुण्यासारख्या शहरात अधिकारी होण्याचा स्वप्न घेऊन आले. गावाकडे आई वडील शेतमजुरी करतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


सकाळशी बोलताना संतोष यांनी आपला संघर्षमय प्रवास उलघडला. ते म्हणाले, 'सुरूवातीला पुण्यात कोणच ओळखीचे नव्हते. पण मेसमध्ये दोन मित्रांची चांगली ओळख झाली. माझी सर्व परिस्थिती त्या दोघांना सांगितली. ते दोघे पुण्यात खूप दिवसांपासून राहत असल्याने  त्यांनी मला एका अभ्यासिकेत काम मिळवून दिल. राहण्याची सोय अभ्यसिकेतच होती. पण अभ्यासिकेतील काम करत असल्याने अभ्यास सातत्याने करणे खूप कठीण होत पण जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे मिळेल त्या वेळी अभ्यास केला. अभ्यासिकेत काम करत असताना मला काही विद्यार्थ्यांकडून त्रास सोसावा लागला तर काही विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन दिले. सकाळपासून दुपारपर्यंत अभ्यासिकेचे व्यवस्थापन आणि दुपारनंतर रात्रीपर्यंत अभ्यास. २०१७ मध्ये सर्व परीक्षांमध्ये अपयश मिळाल पण आई वडिलांचे कष्ट हेच खरी प्रेरणा होती.'

अभ्यासात सातत्य ठेवून तो अभ्यास करत राहिला. दरम्यानच्या काळात त्याला अभ्यासिकेत काही अधिकार्‍यांची ओळख झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना यशापर्यंत पोहचता आल. अभ्यासिकेत काम करत असतानाचे दिवस हे वाईटच होते पण त्या दिवसांतूनच मी तयार होऊ शकलो माझ व्यक्तिमत्व घडू शकल. शेवटी एवढच सांगेन प्रामाणिकपणे प्रयत्न केल तर देव काहीच कमी पडू देत नाही. या प्रसंगात मला भेटलेले लोक ही माझ्यासाठी देवच होते, अस माझं म्हणन आहे. प्रामाणिकपणे मेहनत केल तर देव काहीच कमी पडू देत नाही. प्रामाणिकपणा हीच माझी मोठी संपत्ती होती.
या सगळ्या घडामोडीत मला आई, वडील, बंधू अभ्यासिकेचे संस्थापक यांची मला मोलाची मदत झाली अशी माहिती संतोष यांनी दिली  .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com