esakal | ‘एसएमएस’द्वारे पाठवा वीजमीटरचे रीडिंग

बोलून बातमी शोधा

Electricity Meter Reading
‘एसएमएस’द्वारे पाठवा वीजमीटरचे रीडिंग
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मोबाईल ॲप व वेबसाइटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता महावितरणने मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रीडिंग पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट फोन नाही, अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

असे पाठवा मीटर रीडिंग

‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रीडिंग पाठविण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><१२ अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रीडिंग ८ अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे.

कसा पाठवायचा ‘एसएमएस’

उदाहरणार्थ - १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे KWH रीडिंग ८९५० असे असल्यास MREAD १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारण्यात येणार नाही व ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा