Amitesh Kumar and Supriya Sule
sakal
पुणे - 'पुणे शहरासह राज्य 'क्राईम कॅपिटल' बनले असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे, असे असताना पोलिस आयुक्तांनी मला शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करणारे पत्र पाठविले आहे. त्यांनी हे पत्र मला पाठविण्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवायला हवे होते,' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना टोला लगावला.