Pune News : पुण्यासाठी स्वतःचे धरण बांधण्याचा सरकारकडे प्रस्ताव पाठवा; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची मागणी

पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पुणेकरांना पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागावर अवलंबून राहण्याऐवजी महापालिकेने स्वतःचे धरण बांधावे.
Pune Opposition Leader Nilesh Nikam

Pune Opposition Leader Nilesh Nikam

sakal

Updated on: 

पुणे - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पुणेकरांना पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागावर अवलंबून राहण्याऐवजी महापालिकेने स्वतःचे धरण बांधावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी केली आहे. स्वतःच्या मालकीचे धरण बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा, असा ठराव त्यांनी महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडे सादर केला आहे.

Loading content, please wait...