Pune Crime News : पुण्यात सेक्सटॉर्शनचा नंगानाच! ६४ वर्षीय आजोबांना व्हिडीओ कॉल करत लाखोंना लुटलं | Pune Sextortion news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Sextortion news

Pune Crime News : पुण्यात सेक्सटॉर्शनचा नंगानाच! ६४ वर्षीय आजोबांना व्हिडीओ कॉल करत लाखोंना लुटलं

पुणे : पुणे शहरात सेक्सॉर्टशनच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत. सेक्सॉर्टशनचा आणखी एक भयंकर प्रकार समोर आला आहे. पुण्यातील ६४ वर्षीय वृद्धाची तब्बल ४ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Pune Sextortion news)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका ६४ वर्षीय आजोबांना व्हिडिओ कॉल करुन न्यूड होण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर ही व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ ते २५ मार्च दरम्यान घडली असून याप्रकरणी मॉडेल कॉलनीतील गोखलेनगरमधील एका ६४ वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना एका तरुणीने त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल केला. तसेच त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत न्यूड होण्यास भाग पाडले. हा संपूर्ण कॉल सुरू असतानाच त्याचे स्क्रिन रेकॉर्डिंग करुन व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

तसेच आणखी एका आरोपीकडून पोलिस असल्याचे सांगत धमकावण्यात आले. तसेच हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ४ लाख ६६ हजारांची रक्कम घेण्यात आली. या प्रकरणी पुण्याच्या चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Pune News