accident compensation
sakal
पुणे - भरधाव डंपरच्या धडकेत दोन्ही पाय गमावलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्हा न्यायालयातील मध्यस्थी प्रक्रियेद्वारे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने त्यांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली. दीर्घकाळ न्यायालयीन लढाई टाळून अल्पावधीतच मिळालेल्या या भरपाईमुळे अपघातग्रस्त दुचाकीचालकाचा दिलासा झाला आहे.