esakal | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भिमाजीशेठ गडगे यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Bhimaji_Gadge

आळेफाटा आणि वडगाव-आनंद परिसरातील विविध धार्मिक, सामाजिक, सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भिमाजीशेठ गडगे यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा (पुणे) : जुन्नर तालुका काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भिमाजीशेठ कमळू गडगे (वय ७४) यांचे  शनिवारी (ता.१०) अल्पश:आजाराने पुणे येथे निधन झाले. श्री विघ्नहर साखर कारखान्याचे त्यांनी १६ वर्षे संचालक, तर १२ वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते तालुका काँग्रेसचे पाच वर्षे अध्यक्ष होते.

पुण्यात IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन​

आळेफाटा आणि वडगाव-आनंद परिसरातील विविध धार्मिक, सामाजिक, सहकारी तसेच शैक्षणिक संस्थांच्या कामकाजात त्यांचा मोलाचा सहभाग होता. येथील गोमाता सहकारी पतसंस्था, गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्था, शिवछत्रपती नगर विकास संस्था, जय बजरंग प्रतिष्ठान या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे ते कार्यरत होते. माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. जुन्या काळातील केळीचे व्यापारी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. श्री विघ्नहर साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश गडगे हे त्यांचे पुत्र होत.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)