esakal | पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_City_Police

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करुन मागील आठवड्यात शेख विरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वैद्यकीय उपचारानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रौफ शेख यास गुरुवारी (ता.१८) पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी शेख याच्या कैम्प परिसरातील घराची झडती घेण्यास सुरुवात केली.

- पीककर्ज वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय केल्या सूचना?

विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या शेख याने आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी एका वृद्ध व्यावसायिकाकडून 75 लाख रुपये घेतले. त्यानंतर शेख, त्याच्या साथीदाराने वृद्ध व्यावसायिकाची कोट्यावधी रुपयांची संपत्ती जबरदस्तीने त्याच्या बहिणीच्या नावावर केली होती.

- महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी

दरम्यान, संबंधीत प्रकरण पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणाची चौकशी करुन मागील आठवड्यात शेख विरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करुन शेख यास अटक केली होती.

- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

शेख यास अचानक उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास जाणवल्याने ससुन रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यास न्यायालयात हजर करता आले नव्हते. गुरुवारी उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी शेख यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.

दरम्यान, या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस उपायुक्त सुधाकर यादव यांच्या पथकाने शेख याच्या कैम्प परीसरातील ईस्ट स्ट्रीटवरील यूनिवर्सल अपार्टमेंट येथे असलेल्या घराची झडती घेण्यात सुरुवात केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image