इंदापुरातील ज्येष्ठ व्यापाऱ्याचा कोरोनाने मृत्यू 

डाॅ. संदेश शहा
शुक्रवार, 10 जुलै 2020

इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात राहणाऱ्या 72 वर्षीय व्यापाऱ्याचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाचा हा दुसरा. तर तालुक्यातील हा तिसरा मृत्यू ठरला आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरातील महतीनगर परिसरात राहणाऱ्या 72 वर्षीय व्यापाऱ्याचा आज सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाचा हा दुसरा. तर तालुक्यातील हा तिसरा मृत्यू ठरला आहे.

इंदापूर शहरातील मृत्यू झालेले ज्येष्ठ आडत व्यापारी विविध कंपन्यांचे तालुका वितरक म्हणून व्यवसाय करत होते. इंदापूर येथील श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर उभारणीमध्ये त्यांनी सक्रिय योगदान दिले होते. त्यांच्या मृत्यूमुळे शहर जैन समाज व व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेले तीनही ज्येष्ठ नागरिक होते. त्यांना विविध आजार होते. तसेच, कोरोना लागण झाल्याने त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी न करता योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी केले. इंदापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी आपली औषधे वेळेवर घ्यावित व सर्व शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल यांनी केले

Edited by : Nilesh Shende  आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior trader from Indapur dies of corona disease