Pune : जेष्ठ व्हायोलीन वादक पंडित भालचंद्र देव यांचे निधन

 Senior Violinist swarbhar bhalchandra deo Death
Senior Violinist swarbhar bhalchandra deo Deathsakal

पुणे : जेष्ठ व्हायोलीन वादक पं.भालचंद्र दामोदर देव यांचे आज पहाटे ३ वाजता निधन झाले.. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी निला देव, कन्या आणि शिष्या सौ.चारुशीला देव, मुलगा चित्तरंजन देव आहेत. त्यांचेवर सकाळी दहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 Senior Violinist swarbhar bhalchandra deo Death
नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत - छगन भुजबळ

दोनच दिवसांपूर्वी ९ जानेवारीला त्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. त्याच कार्यक्रमात अचानक त्यांची तब्येत बिघडली. तातडीने दिनानाथ मध्ये हलविल. नंतर संजीवनी रुग्णालयात आय सी यु मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यातच त्यांची तब्येत बिघडली. रात्री ३च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 Senior Violinist swarbhar bhalchandra deo Death
Marathwada Corona Update : ८७३ कोरोनाग्रस्त

पं. भालचंद्र देव नाना म्हणून संगीत क्षेत्रात ओळखले जात. पं. गजाननराव जोशी यांचे ते शिष्य. पुण्यात त्यांनी अनेकविध कार्यक्रमतुन साथ केली. भारत गायन समाजात पन्नास वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना व्हायोलीनचे धडे दिले. आजही ते अनेकांना व्हायोलिन शिकवीत होते. शिस्तशीर आयुष्य आणि गुरुंवरची अढळ श्रद्धा हेच त्यांचे प्रमुख गुण होते. ते आदर्शवत आयुष्य जगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com