suhana swasthyam Walkathon
esakal
पुणे - सकाळच्या गुलाबी थंडीत नृत्यावर थिरकणारे, उत्साहाने ‘वॉक’ करण्यासाठी सराव करणारे, चालताना चेहऱ्यावरचा आनंद आणि सळसळता उत्साह... सेल्फी आणि फोटोंसाठी ‘चिअर्स’ करत जल्लोष करणारे ज्येष्ठ... आणि पाच व तीन किलोमीटर चालण्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर तरुणाईलाही लाजवेल असा जल्लोष... हे विलोभनीय आणि ऊर्जा देणारे चित्र बघण्यास मिळाले ‘वॉक फॉर सुहाना स्वास्थ्यम्’ या ‘वॉकेथॉन’च्या निमित्ताने. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, ‘वय फक्त एक आकडा असतो’ हे सिद्ध केले.