esakal | श्रीधर फडके यांची भावना; ‘गदिमा जीवनगौरव’ प्रदान । pune
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीधर फडके यांची भावना; ‘गदिमा जीवनगौरव’ प्रदान

श्रीधर फडके यांची भावना; ‘गदिमा जीवनगौरव’ प्रदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सुधीर फडके (बाबूजी) यांचा विवाह झाला. त्याप्रसंगी महम्मद रफी मंगलाष्टका गाण्यासाठी आले होते. माझ्या लग्नाचा स्वागत समारंभदेखील याच सभागृहात झाला. त्यावेळी आशीर्वाद देण्यासाठी गदिमा सपत्नीक आले होते. भावनिक नाते असलेल्या याच सभागृहात ‘गदिमा जीवनगौरव सन्मान’ मिळणे हे क्षण भावुक करणारा आहे. गदिमा सन्मान हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे,’’ असे मत ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

महाराष्ट्र साहित्य परिषद, गदिमा कुटुंबीय, महाराष्ट्र कामगार परिषद यांच्या वतीने गदिमांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित २९ व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवात फडके यांना गदिमा जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर, नारायण सुर्वे, साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

loading image
go to top