esakal | विद्यार्थ्यांनो, नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी! शेवटची मुदत...
sakal

बोलून बातमी शोधा

September 10 is Deadline to apply for NET exam

कोरोनाची साथ येण्यापुर्वी "नेट'साठी अर्ज मागविण्यात आले होते.  मात्र लाॅकडाऊन जाहीर झाल्याने काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्या विद्यार्थ्यांना"सीएसआयआर-यूजीसी नेट' परीक्षेसाठी अर्ज करण्यास २२ ऑगस्टपासून लिंक खुली करण्याचा निर्णय "नॅशनल टेस्टिंग एजन्सीने' घेतला आहे.

विद्यार्थ्यांनो, नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची पुन्हा एकदा संधी! शेवटची मुदत...

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात "नेट' परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची साथ येण्यापुर्वी "नेट'साठी अर्ज मागविण्यात आले होते.  मात्र लाॅकडाऊन जाहीर झाल्याने काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्या विद्यार्थ्यांना"सीएसआयआर-यूजीसी नेट' परीक्षेसाठी अर्ज करण्यास २२ ऑगस्टपासून लिंक खुली करण्याचा निर्णय "नॅशनल टेस्टिंग एजन्सीने' घेतला आहे.

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

ऑनलाईन अर्ज ही प्रक्रिया १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असेल. तर १० सप्टेंबर रोजी रात्री ११.५० पर्यंत शुल्क स्वीकारले जाणार आहे. अर्जाचे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. अधिक माहिती www.nta.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

loading image
go to top