राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर शिवसेनेच्या गटनेत्याचे गंभीर आरोप 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

राज्यातील ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे गेले काही महिने वर्गणी गोळा करण्यात व्यग्र होते. त्यांच्या या वर्गणी गोळा करण्याच्या जाहिरातीमुळेच राज्य सरकारवर नामुष्कीची वेळ आली, असा आरोप पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी केला आहे. 

पुणे : राज्यातील ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे गेले काही महिने वर्गणी गोळा करण्यात व्यग्र होते. त्यांच्या या वर्गणी गोळा करण्याच्या जाहिरातीमुळेच राज्य सरकारवर नामुष्कीची वेळ आली, असा आरोप पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी केला आहे. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

शिवसेनेच्यावतीने काल (ता. 18) खेड पंचायत समितीच्या मुख्यालय बांधकामाच्या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर नंदीबैल व जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलताना, पुणे जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला असलेल्या वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना गारटकर यांनी आढळराव यांच्यावर टीका केली होती. त्याला दरेकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, वर्गणी जमा करण्याच्या पराक्रमामुळे गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अडगळीत पडले आहेत. ते जिल्हा परिषदेमध्ये फक्त वर्गणीसाठीच येत असतात. या पलीकडे त्यांना जिल्हा परिषद माहित नाही. त्यामुळे खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या थांबवलेल्या कामाबाबत त्यांचा काडीचाही संबंध नाही. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात बोलण्याचा गारटकर यांना नैतिक अधिकार नाही. आढळराव पाटील तब्बल तीन वेळा विक्रमी मताधिक्‍याने खासदारपदी निवडून आलेले आहेत. सामान्यांचा लोकनेता म्हणून लाखो लोक त्यांचे नेतृत्व स्विकारत आहेत. केवळ एका पराभवाने आढळराव थांबणारे नसून, पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तेच खासदार होणार आहेत.
 - देविदास दरेकर, शिवसेना गटनेते, पुणे जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serious allegations of Shiv Sena group leader against NCP district president