
पुणे - शहरात वर्ष २०२३ च्या तुलनेत मागील २०२४ या वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांत घट झाली आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून आर्थिक व सायबर फसवणूक, ‘स्ट्रीट क्राइम’, महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत चालल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.