लॉकडाऊनमध्ये गंभीर गुन्हे घटले पण...; काय सांगतो पुणे पोलिसांचा रिपोर्ट

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गंभीर गुन्हे घटल्याचे समाधानकारक चित्र होते. तर दुसरीकडे याच कालावधीत मारहाण व दुखापतीच्या घटना काही प्रमाणात वाढल्या आहेत. या घटना वाढण्यामागे लॉकडाऊनमधील बेरोजगारी आणि किरकोळ कारणावरुन पूर्वी झालेल्या भांडणाचा रिकाम्या वेळेत वचपा काढणे ही महत्वाची कारणे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

शहरामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याची चिन्हे दिसु लागल्यानंतर राज्य सरकारने 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे बहुतांश नागरिक आपापल्या घरीच असल्याने तसेच शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे कमी घडले. याऊलट शहरामध्ये किरकोळ कारणामुळे होणारी मारहाण व दुखापतीच्या घटनामात्र मोठया प्रमाणात वाढल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात 2019 या वर्षी जुलै अखेर पर्यंत मारहाण व दुखापतीचे 640 गुन्हे घडले होते. 

तर शहरात मार्चपासुन जुलै पर्यंत लॉकडाऊन असतानाही मारहाण व दुखपतीच्या घटना कमी झाल्या नाहीत. याउलट मागील वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंतच्या घटनाच्या संख्येची पुनरावृत्ती होत या घटना 650 पर्यंत पोचल्या. मागील वर्षी शहरात एकुण सहा हजार 163 गंभीर गुन्हे घडले आहेत, तर यावर्षी जुलै अखेरपर्यंत तीन हजार 35 गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये मारहाणीच्या 97 व दुखापतीच्या 551 घटना आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी,  वाहन व मोबाइल चोरीमध्ये घट झाल्याचे समाधानकारक चित्र आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये किरकोळ गुन्हे केलेल्या कैद्याना कारागृह प्रशासनाने जामीनावर सोडले आहे. या कैद्यापैकी काही सराईत गुन्हेगाराकडुन पूर्वीच्या भांडणाचे कारण काढत किंवा खुनशीतुन मारहाण करणे किंवा दुखापत करण्याच्या घटना घडल्या. मात्र या घटना घडल्यानंतर पोलिसांकडुन तत्काळ कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले.

हे वाचा - खेड, शिरूरची चिंता मिटली, चासकमान धरणात एवढा साठा

शहरात घडणारे गंभीर गुन्हे
- लॉकडाऊन पूर्वी - दर दिवशी 20 ते 30
- लॉकडाऊनमध्ये - दर दिवशी चार ते पाच
- लॉकडाऊन नंतर - काही प्रमाणात वाढ

खुनाच्या घटनाची संख्या "जैसे थे"
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर हडपसर, येरवडा, कोंढवा, सिंहगड रोड, कोथरुड या ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. बहुतांश घटना या जुन्या वादातुन, गुन्हेगाराच्या वर्चस्ववादातुन व खूनशीतुन झाल्या. तसेच मागील वर्षी शहरात 46 खून झाले होते, यावेळी 45 खुनाच्या घटना घडल्या आहेत.

मारहाण व दुखापतीच्या घटना वाढण्याची कारणे
- बहुतांश नागरिक घरी असणे
- हाताला काम नसल्याने होणारी भांडणे
-किरकोळ कारणावरुन पूर्वीचे वाद उकरुन काढणे

शहरातील गुन्हे        2019     2020
खुन                        46           45
खुनाचा प्रयत्न           67          48
दरोडा                      14          03
साखळी चोरी             40         13
मोबाइल चोरी            48           13
घरफोडी                  285         159
मारामारी                   93           97
दुखापत                    535       551
वाहन चोरी               1069       432
इतर चोरी                 827        337
एकुण                    6163        3035

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com