मुलांच्या आरोग्यासाठी ‘सिरम’ कटिबद्ध - डॉ. सायरस पूनावाला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 February 2020

‘सर्वसामान्य जनतेला स्वस्तात औषधे मिळून देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटचे कायम प्रयत्न राहिले आहेत. अनेक देशांमध्ये लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,’’ असे प्रतिपादन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले.

पुणे - ‘सर्वसामान्य जनतेला स्वस्तात औषधे मिळून देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटचे कायम प्रयत्न राहिले आहेत. अनेक देशांमध्ये लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,’’ असे प्रतिपादन इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डॉ. पूनावाला आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांना शनिवारी कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते डी. लिट. पदवी देऊन गौरविण्यात आले. कुलपती डॉ. एस. जी. बापट, प्र-कुलगुरू डॉ. गीताली टिळक, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. 

पुणे : बायकोच्या आत्महत्येच्या पोलिस चौकशीला 'तो' कंटाळला अन्...

डॉ. पूनावाला म्हणाले, ‘‘सिरम इन्स्टिट्यूटच्या उभारणीत प्रत्येक प्रामाणिक व समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कष्टाळू वृत्तीशिवाय आज मी इथपर्यंत पोचू शकलो नसतो. आजही जगात अनेक देशांतील मुलांना लसीकरण केले जात नाही, अशा १७० हून अधिक देशांमध्ये सिरमचे काम सुरू आहे.’

प्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर

चौधरी म्हणाले, ‘‘टिमविमध्ये १९६५ मध्ये इंग्रजी सुधारण्यासाठी क्‍लास लावला होता. त्या वेळी या संस्थेशी संबंध आला. प्राज मॅट्रिक्‍सच्या माध्यमातून इंडस्ट्रिअल बायोटेक स्पेस ॲण्ड ॲडव्हान्स बायोफ्युअलमध्ये संशोधन सुरू आहे.’’

डॉ. टिळक म्हणाले, ‘‘केवळ पदवी मिळवून नोकरी मिळणार नाही, त्यामुळे रोजगाराभिमुख कौशल्यही आत्मसात करण्यासाठी विद्यार्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serum committed to childrens health sayras poonawalla