संकट आलं पण काम थांबलं नाही; सीरममध्ये कर्मचारी आले कामावर, लशीची खेपही रवाना

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 22 January 2021

गुरुवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती.

पुणे- गुरुवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. या दुर्घेटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. या मोठ्या संकटानंतरही सीरमने आपलं काम अविरत सुरुच ठेवलं आहे. गुरुवारी रात्री पुण्यातून लशीची खेप मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाठवण्यात आली आहे. येथून लशीची खेप म्यानमार, मॉरिशससह अनेक देशांमध्ये पाठवण्यात आली आहे.

उद्या मला मुख्यमंत्री व्हावं वाटेल, कुणी करणार का? शरद पवारांचा प्रश्न

सीरम इन्स्टिट्यू्टच्या इमारतीला गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली होती. लस निर्मिती करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये सीरमचा समावेश होतो. कोरोनावर मात करण्यासाठी सीरम महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. देशात सीरमची लस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. अशात अचानक सीरमच्या एका इमारतीला आग लागल्याने चिंता वाढली होती. यामुळे कंपनीच्या कामावर परिणाम पडण्याची शक्यता होती. पण, सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी काही तासातच पुन्हा उभारी घेतली आहे. सीरममध्ये काम पुर्वीसारखंच सुरु झालं आहे. कर्मचारी आपल्या कामावर आले आहेत. 

आग लागल्याचे कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. पण, त्याच इमारतीत सहाव्या मजल्यावर सायंकाळी पुन्हा आग लागली. अग्नीशमन दलाने पुन्हा ही आग विझवली. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान, याप्रकरणी चौकशी होणार आहे.

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्माने उचललं मोठं पाऊल

कोरोनावरील कोविशील्ड या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute fire broke out but work started again corona vaccine