चांदणी चौकातील सर्व्हिस रोड बंद; पुलाच्या कामामुळं वाहतुकीत बदल!

Service Road at Chandni Chowk closed Changes in traffic due to bridge work
Service Road at Chandni Chowk closed Changes in traffic due to bridge work
Updated on

कोथरूड :  उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने चांदणी चौक पुलावरुन कोथरुड व साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे. 15 मार्चपासून हा बदल होणार आहे

चांदणी चौक, कोथरूड, वारजे, बाणेर या भागातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौकात दुमजली उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरु आहे. हे पूल चांदणी चौकातून मुंबई, सातारा, मुळशी आणि कोथरूडला जोडले जातील. सध्या या कामासाठी सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असला तरी पर्यायी मार्ग म्हणून भूगाव, एनडीए आणि कोथरुड रस्त्यावरुन येणारी वाहतूक ही चांदणीचौक पुलावरुन पाषाणकडे जाणा-या रस्त्यावरील व्हीवा हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून महामार्गावरुन चांदणी चौक वा साताऱ्याच्या दिशेने जावू शकतील. 

साध्या वेषात जॅकी श्रॉफ पोहोचला मावळात; घरकाम करणाऱ्या तरुणीचं केलं सांत्वन
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बावधन व पाषाण कडून येणारी वाहतूक चांदणी चौक पुलावर न जाता ती वाहने व्हीवा हॉटेल येथे उजवीकडे वळून महामार्गावरुन चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने जावू शकतील. त्यामुळे नागरीकांनी गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने केले आहे. डीसीपी (वाहतूक) सुधीर हिरेमठ म्हणाले की,  पुढील आदेश येईपर्यंत हा रहदारी मार्ग बदलण्यात येईल आणि लोकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com