विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : 'सेट'चा अर्ज भरण्यास मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

विद्यापीठाच्या सेट विभागाने यंदाच्या सेट परीक्षे 28 जून ही तारीख निश्‍चीत केली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्यास आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 29 जानेवारी पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. तर दुरुस्तीसाठी 6 फेब्रवारी पर्यंत मुदत आहे, असे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यापीठाच्या सेट विभागाने यंदाच्या सेट परीक्षे 28 जून ही तारीख निश्‍चीत केली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. मंगळवारी (ता. 21) ऑनलाईन अर्ज भरण्याची आज शेवटचा दिवस होता. दरम्यान आत्तापर्यंत 84 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरला असून त्यातील 74 हजार जणांनी ऑनलाईन पैसे जमा केले आहेत.

शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा मोदींशी तुलना; सोशल मीडियावर भडका

"सेट'च्या संकेतस्थळाच्या तांत्रीक अडचणींमुळे अनेक विद्यार्थांना अर्ज भरण्यात अडथळे येत असल्याने अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी एनएसयूआय, युवक कॉंग्रेस आणि युवक क्रांती दलाकडून करण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने आठ दिवसांची मुदत दिली आहे.
विद्यार्थ्यांना 22 ते 29 जानेवारी या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत विषय आणि जात यातील दुरुस्ती करण्याची मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जात सुधारणा करता येणार नाहीत.

क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर करताना 2019-20 चे वैध प्रमाणपत्र आवश्‍यक आहे, असे सेट विभागाचे डॉ. बाळासाहेब कापडनीस यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या तारखा
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ - 22 ते 29 जानेवारी
दुरूस्तीची मुदत 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी
परीक्षा - 28 जून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: set exam application time period extended in Pune University